home
Admin Login

नोंदणी करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावयाच्या सुचना:-

बाल न्याय (मुलांची काळजी वं संरक्षण) अधिनियम-2000 व सुधारित अधिनियम-2006 मधील कलम 2 (d) नुसार व्याख्या केलेल्या अनाथ, निराधार, निराश्रीत, एक पालक असलेल्या, दुर्लक्षित, दुर्बल, दोन्ही पालक आहेत पण ते अपंग/ अंध/ एचआयव्ही गस्त/ तुरुंगात/ दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशा पालकांची मुले/ हातून गुन्हा घडणारी मुले/ गुन्हयात अडकलेली मुले/ बालकामगार/ भिक्षा मागणारी मुले/ मतिमंद/ एचआयव्ही ग्रस्त/ अंध मुले (ऐेक पालक असलेली व पालक नसलेली) या सारख्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच विधी संघर्षग्रस्त मुले यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाची यापुर्वी मान्यता/ नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या तसेच मान्यता/ नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या ज्या संस्था वरील मुलांसाठी निवासी गृहे चालवितात. त्या सर्व संस्थांनी त्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेची मुलांसाठी/ मुलींसाठी/ मुलां-मुलींसाठी जर एकापेक्षा जास्त निवासी गृहे असतील, अशा प्रत्येक निवासी गृहासाठी सविस्तर माहितीसह स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म / नमुन्यातील प्रत्येक मुद्याची माहिती भरणे आवश्यक राहिल. अर्धवट भरलेले फॉर्म स्विकारले जाणार नाही.